Home संगमनेर संगमनेरात आ. आव्हाड यांच्या अटकेसाठी रास्ता रोको

संगमनेरात आ. आव्हाड यांच्या अटकेसाठी रास्ता रोको

Breaking News | Sangamner:  प्रभू श्रीरामांबद्दलवादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी, या मागणीसाठी शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या संगमनेर बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन.

Come to Sangamner Block the way for Awad's arrest

संगमनेर : प्रभू श्रीरामांबद्दलवादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी, या मागणीसाठी शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काल रविवारी (दि.७) संगमनेर बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी आ. आव्हाड यांच्या निषेधार्थ तुफान घोषणाबाजी केली. पोलिसांनी सुमारे ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. सायंकाळी काही संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार आव्हाड यांच्या वाहनावर अंडे व काळ्या रंगाचे बॉक्स फेकले. त्यामुळे शहरामध्ये काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित

क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी निमित्त काल रविवारी (दि.७) संगमनेरात पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आमदार जितेंद्र आव्हाड हे काल संगमनेरात आले होते. संगमनेर येथे येण्यास शहरातील भारतीय जनता पक्ष, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध दर्शवला होता. आ.

आव्हाड यांना अटक करावी, या मागणीसाठी शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करून नाशिक-पुणे महामार्ग काहीकाळ रोखून धरला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी केली. हे कार्यकर्ते कार्यक्रम स्थळाकडे निघाल्याने पोलिसांनी रस्त्यातच सर्वांना अडवून त्यांना ताब्यात घेतले. याकार्यकर्त्यांना वेगवेगळ्या वाहनांमधून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे दणाणून सोडले होते. यावेळी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ, कुलदीप ठाकूर, सचिन कानकाटे, राजेंद्र सांगळे, दिपक भगत, जगन्नाथ शिंदे, अमोल रणाते, दिलीप रावल, ज्ञानेश्वर थोरात, सोमनाथ कानकाटे, महेश मांडेकर, सोमनाथ नेहे, केशव दवंगे, हरीष वलवे, विकास गुळवे यांच्यासह सुमारे ४५ ते ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दुपारनंतर या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.

Web Title: Come to Sangamner Block the way for Awad’s arrest

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here