Home Marathi Batmya Today Live गुंजाळवाडी माळातील पहिलाच प्रयोग: स्तुत्य उपक्रम, झाडाला मिळाले जीवनदान

गुंजाळवाडी माळातील पहिलाच प्रयोग: स्तुत्य उपक्रम, झाडाला मिळाले जीवनदान

गुंजाळवाडी माळातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम (tree got a life-giving gift).

  commendable initiative, the tree got a life-giving gift

गुंजाळवाडी (माळ): येथे श्री. तुकाराम विठोबा गुंजाळ’ व ‘लाल मारुती मंदिर देवस्थान आणि सप्तशृंगी माता मंडळ’ यांच्या वतीने घराशेजारी  उगवलेल्या वडाच्या झाडाचे प्रत्यारोपण अन्य ठिकाणी करून ते झाड जगवण्याचा प्रयत्न केला गेला अशाप्रकारे 15 फूट उंचीच्या मोठ्या झाडाच्या पत्यारोपणाचा प्रयोग यशस्वी झाला आहे वटवृक्ष प्रत्यारोपणाचा गुंजाळवाडी माळातील हा पहिलाच प्रयोग आहे.

घराशेजारी नैसर्गिक रित्या उगवलेल्या या झाडामुळे झाडाच्या स्वतःच्या वाढीसाठी व इमारतीसाठी अडचणी येत होत्या हे हे लक्षात येताच वृक्ष प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला दरम्यान मंडळातील सदस्यांनी ते झाड पाहिले व श्री तुकाराम विठोबा गुंजाळ यांचे चर्चा करून हे झाड दुसऱ्या ठिकाणी प्रत्यारोपण करता येईल याची खात्री केली. तुकाराम श्री तुकाराम विठोबा गुंजाळ यांनी जेसीबीच्या साह्याने स्वखर्चाने झाड काढले व गुंजाळ वाडी माळ येथील लाल मारुती मंदिर या परिसरात जेसीबीच्या मदतीने खड्डा करून यशस्वीरित्या प्रत्यारोपण केले. हिंदू धर्मात वटवृक्षाला ‘देव वृक्ष’ मानले जाते. देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेलाही विशेष स्थान आहे. वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून त्याला ‘अक्षयवत’ असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकरांनी ही वटवृक्षा खाली तपश्चर्या केली. मार्कंडेय ऋषींना ही वटवृक्षाच्या पानावर भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले व देवी सावित्री ने ही आपल्या पती सत्यवानाला वाचवण्यासाठी वडाच्या झाडाखाली बसून यमराज्यांपासून त्याचे प्राण वाचवले. भरपूर प्राणवायू  (ऑक्सीजन) देणाऱ्या आणि पक्ष्यांचे जीवन तोलून धरणाऱ्या वृक्षांमध्ये वडाचे झाडाचे विशेष महत्त्व आहे.  याच परिसरात जुन्या मारुती मंदिराच्या जीर्णोद्धार व नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे काम सुरू आहे या ठिकाणी अर्धशक्तीपीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या आई सप्तशृंगी देवीचे ही मंदिर आहे अनेक धार्मिक आणि सामाजिक उपक्रम या मंदिर परिसरात घेतले जातात या झाडामुळे मंदिराची शोभा वाढेल. या झाडाची उंची 12 ते 15 फूट आहे घेर दोन ते तीन फूट आहे झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी गणेश बाळासाहेब गुंजाळ, संदीप भाऊसाहेब गुंजाळ व  मंडळातील सर्व सदस्यांनी घेतली आहे.

गुंजाळवाडी गावातील कोणत्याही ठिकाणचे झाड वाचण्यासाठी कोणतेही किंवा नवीन झाड दान देण्यासाठी व अन्य कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी मंडळाशी संपर्क साधावा देवस्थानच्या वतीने झाड वाचवण्यासाठी मदत करू.                                 -किशोर आप्पासाहेब गुंजाळ 9921409238

-नितीन संभाजी गुंजाळ9762233741

-निलेश उमाकांत गुंजाळ 7709327536

-गुंजाळ किरण मोहन गुंजाळ 9822131398

(सदस्य लाल मारुती मंदिर देवस्थान व सप्तशृंगी माता मंडळ हरेवाडी गुंजाळवाडी (माळ).

Web Title: commendable initiative, the tree got a life-giving gift

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here