मुंबईतील मॉडेलवर बलात्कार, तसेच धर्मांतरासाठी दबाव आणल्याची तक्रार
Rape Case: लग्नाचे आमिष दाखवून मॉडेलवर बलात्कार केल्याची घटना.
मुंबई: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना मुंबईतून समोर आली आहे तसेच पीडिता मॉडेल असून तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. पीडित मॉडेलच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. एनडीटीव्हीने या संदर्भातील वृत्त दिले आहे. पीडिता २३ वर्षीय मॉडेल असून ती २०२० पासून तन्वीरच्या मॉडेलिंग एजन्सीमध्ये कामाला होती.
नुकताच, ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. धर्मांतर करून महिलांना कसं फसवलं जातं हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. या पीडित मॉडेलनेही हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहून प्रभावित होऊन तिने आरपीविरोधात तक्रार दाखल करण्याची हिंमत केली, असं पोलिसांनी सांगितलं.
तन्वीर अख्तर लेख खान (४०) असं आरोपीचं नाव असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पीडिता २३ वर्षीय मॉडेल असून ती २०२० पासून तन्वीरच्या मॉडेलिंग एजन्सीमध्ये कामाला होती. तन्वीरने सुरुवातीला त्याची ओळख लपवली होती. परंतु, चार महिन्यांतच त्या मॉडेलला त्याचं खरं नाव माहिती पडलं. हे दोघेही काही वेळ रिलेशनशिपमध्ये होते.
आरोपीने तिला रांचीला नेले होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसंच तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठीही दबाव आणला होता. तसंच, मुंबईत असताना त्याने तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला होता, असाही आरोप पीडितेने केला आहे. वर्सोवा पोलिसांनी भारतीय दंड संहिता अंतर्गत कथित बलात्कार आणि इतर संबंधित गुन्ह्यांसाठी एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान, बलात्कार रांची येथे झाल्याने संबंधित प्रकरण पोलिसांनी रांचीला वर्ग केले आहे.
Web Title: Complaints of rape of model in Mumbai, pressure to convert
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App