अकोले: निळवंडे कालवे खोदाईचा पहिला टप्पा पूर्ण
अकोले: निळवंडे धरणाच्या मुख्य कालव्यांची कामे अकोले तालुक्यात युद्ध पातळीवर चालू आहे. कालवे खोदाईचा अकोले तालुक्यातील पहिला १८ कि.मी. चा टप्पा पूर्ण झाला असून कालवा खोलीकारणाच्या दुसऱ्या टप्प्याचेही काम आज सुरु करण्यात आले आहे.
अकोले तालुक्यात पोलीस बंदोबस्तात कालव्यांची कामे सुरुवात करण्यात आली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचा किरकोळ विरोध वगळता दिनांक १२ जून २०१९ रोजी सुरु झालेल्या कालवे खोदाईचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील कालवा खोलीकरण खोदाइची कामही आज सुरु झाले आहे. अकोले तालुक्यात एकूण १८ किलोमीटर कालवा असून पैकी ६ कि.मी. चे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. म्हाळादेवी येथील जलसेतूपासून आज खोलीकारानाला सुरुवात करण्यात आली.
Website Title: Complete the first stage of the Nilwande canal