Home अकोले विज्ञानाची कास धरल्यानेच आपल्या देशाची प्रगती- प्रकाश टाकळकर

विज्ञानाची कास धरल्यानेच आपल्या देशाची प्रगती- प्रकाश टाकळकर

अकोले | Mathematics Science Exhibition News: तालुकास्तरीय ५० व्या गणित विज्ञान प्रदर्शनाची सांगता.

Conclusion of Akole Taluka Level 50th Mathematics Science Exhibition

अकोले: विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्याच्या सजन शीलतेला वाव देणारे आहे. शाळेच्या चार भिंती बाहेरचे उपक्रम हे प्रेरणा देणारे असून विज्ञानाची कास धरल्यानेच आपल्या देशाची प्रगती झाली असे सांगतानाच विद्यार्थ्यांनी केवळ विज्ञान प्रदर्शनावर अवलंबून न राहता  विज्ञानात पुढे प्रगती करायची असेल तर शासनस्तरावर असलेल्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जेष्ठ पत्रकार तथा सेवानिवृत्त प्राचार्य प्रकाश टाकळकर यांनी केले.

अकोले तालुक्यातील राजूर (Rajur) येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात तीन दिवशीय तालुकास्तरीय ५० व्या गणित विज्ञान प्रदर्शनाची सांगता आज गुरुवारी करण्यात आली यावेळी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना टाकळकर बोलत होते. जिल्हा परिषद अहमदनगर, पंचायत समिती अकोले व अकोले तालुका गणित विज्ञान संघटना यांच्या वतीने पन्नासावे तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शन राजुर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुर येथे  आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन गटविकास अधिकारी राहुल शेळके यांच्या हस्ते दिनांक १७ जानेवारी रोजी करण्यात आले. प्रदर्शनात ३०० प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले.प्रथम ,द्वितीय,तृतीय बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .  यावेळी व्यासपीठावर आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी डॉ. सुनील बारसे. नामदेव झरेकर  जालिंदर खताळ.( प्रभारी गट शिक्षणाधिकारी). बाळासाहेब  दोरगे.( विस्तार अधिकारी.) सविता कचरे (विस्ताराधिकारी) शांताराम काळे (सचिव स्वामी समर्थ सेवा संस्था राजुर )  सत्य निकेतन संस्थेचे सचिव टी.एन.कानवडे  प्राचार्या मंजुषा काळे, प्रकाश महाले. गणित विज्ञान संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, शाळेच्या व्यासपीठावर मिळणारे बक्षीस हे तुम्ही कधीही विसरू शकत नाही. कला क्रीडा यातील सहभागापेक्षा विज्ञान प्रदर्शनातील सहभाग हा वेगळा आहे विज्ञान प्रदर्शन विचार प्रक्रिया करायला लावणार आहे जीवनात पुढे जायचे असेल तर तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे त्यासाठी बोलायला शिका प्रश्न विचारायला शिका तुमच्यातील कूतूहल जागृत झाले पाहिजे विज्ञान प्रदर्शन तुमच्या जीवनातील सजनशील तेला वाव देणारे असणारे पाहिजे जीवनाचा सर्व क्षेत्रात आपण प्रगती केली आहे ती विज्ञानाची कास धारण केल्यामुळे आहे. १९७२ दुष्काळात दुसऱ्या देशातून मिलो आणून आपण खात होतो .आपला देश आज अन्नधान्य स्वयंपूर्ण  आहे त्यासाठी  विज्ञान कारणीभूत आहे. आज या ठिकाणी  तुम्हाला जरी वाव मिळाला नसला तरी पुढे अनेक संधी तुम्हाला चालून येतील  आपल्या भागातील गरजा पुरवण्यासाठी संशोधन करण्याची गरज आहे. . यावेळी  डॉक्टर सुनील बारसे. टी.एन.कानवडे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ यांनी केले तर अहवाल वाचन विज्ञान संघटनेचे अध्यक्ष सतीश काळे यांनी केले. आभार सौ मंजुषा काळे यांनी मानले तर सूत्रसंचालन किरण भागवत यांनी केले.

Web Title: Conclusion of Akole Taluka Level 50th Mathematics Science Exhibition

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here