Home अहमदनगर अहमदनगर: कंटेनर व मोटारसायकलचा अपघात, पती जागेवरच ठार झाले तर पत्नी जखमी

अहमदनगर: कंटेनर व मोटारसायकलचा अपघात, पती जागेवरच ठार झाले तर पत्नी जखमी

Ahmednagar News:  जवळके-धोंडेवाडी चौफुलीवर कंटेनर व मोटारसायकलचा अपघात, पती जागेवरच ठार झाले तर पत्नी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असुन त्यांची प्रकृती चिंताजनक.

Container and motorcycle accident, husband killed on the spot and wife injured

कोपरगाव:  कोपरगाव तालुक्यातील जवळके-धोंडेवाडी चौफुलीवर कंटेनर व मोटारसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असुन या अपघातात पती जागेवरच ठार झाले तर पत्नी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असुन त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. ही घटना शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी कि, राहता तालुक्यातील जळगाव येथील अशोक विठ्ठल गुंड (वय-५८) व पत्नी शोभा अशोक गुंड (वय-५३) हे संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे नातेवाईकाकडे मोटारसायकलवर (क्रमांक-एम.एच.१७ एन ३७१०) जात असतांना कोपरगाव संगमनेर रस्ता क्रास करतांना जवळके चौफुलीवर भरघाव वेगाने जाणा-या आयशर कंपनीच्या कंटेनरने(क्रमांक- एम.पी.०९ जी.जे.०१२१ ) मोटारसायकलला जोराची धडक दिली.

दोघांनाही स्थानिकांनी शिर्डी येथे साईबाबा हॅास्पीटलमध्ये दाखल केले. परंतु अशोक गुंड हे जागेवरच ठार झाले होते. तर त्यांच्या पत्नी शोभा ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर तेथे उपचार करुन पुढील उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालकाने त्या ठिकाणाहुन पळ काढला. अशोक गुंड यांच्या पश्चात दोन विवाहीत मुली व एक अविवाहीत मुलगा आहे.

Web Title: Container and motorcycle accident, husband killed on the spot and wife injured

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here