Home क्राईम खळबळजनक! कंत्राटी वायरमनचा खांबावरच झाला कोळसा

खळबळजनक! कंत्राटी वायरमनचा खांबावरच झाला कोळसा

Crime News: वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढलेल्या कंत्राटी वायरमनचा शॉक (Electric Shock) लागून खांबावरच अक्षरश: कोळसा झाला.

contract wireman got caught on the pole due to electric shock

नेर | यवतमाळ: वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढलेल्या कंत्राटी वायरमनचा शॉक लागून खांबावरच अक्षरश: कोळसा झाला. शुक्रवारी सकाळी शिरसगाव पांढरी शेतशिवारात घडलेल्या या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला. विद्युत केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. जनक्षोभ पाहता, पोलिसांनी वीज ऑपरेटरसह तिघांना ताब्यात घेतले. चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

खरडगाव (ता. नेर) येथील पंकज दुर्योधन करडे (२५) हा विद्युत कंपनीत चार वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. तो शुक्रवारी सकाळी शिरजगाव पॉवर हाऊसमध्ये आला. वीजपुरवठा बंद करून ऑपरेटर गजानन रमाकांत चक्करवार यांना सांगून दुरुस्तीसाठी निघून गेला. पंकज खांबावर चढला. त्याचवेळी विद्युतपुरवठा सुरू झाल्याने शॉक लागून पंकजचा खांबावरच मृत्यू झाला.

ऑपरेटर गजानन चक्करवार याला संतप्त जमावाने मारहाण केली. पोलिसांनी त्याची जमावाच्या तावडीतून मुक्तता केली. ऑपरेटर व इतर तिघांनी वीजपुरवठा सुरु केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.

Web Title: contract wireman got caught on the pole due to electric shock

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here