अकोले तालुक्यात या गावांत आढळले करोना बाधित रुग्ण
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज मंगळवारी सात जण करोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३३०९ इतकी झाली आहे. अकोले तालुक्यातील २१ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात रुंभोडी येथील ६० वर्षीय महिला, शिवाजी रोड अकोले येथे १६ वर्षीय मुलगा, गणोरे येथील ३२ वर्षीय महिला, भोलेवाडी कोतूळ येथील ३५ वर्षीय महिला, अंभोळ येथील १४ वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथे ५२ वर्षीय महिला, समशेरपूर येथे १६ वर्षीय मुलगा असे सात करोना बाधित आढळून आले आहेत.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात २१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात २३५ नवे रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण उपचार १७५६ व्यक्तींवर सुरु आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७८३५९ इतकी झाली आहे. मृत्यू ११६१ तर एकूण बरे झालेले रुग्ण ७५४४२ इतकी आहे.
Web Title: Corona infected patients were found in this village in Akole