Home महाराष्ट्र ब्रेकिंग: राज्यात ओमिक्रॉनचे आणखी दोन रुग्ण: एकूण १०

ब्रेकिंग: राज्यात ओमिक्रॉनचे आणखी दोन रुग्ण: एकूण १०

Corona News Maharashtra another Two Omicron Patient 

मुंबई | Corona News: आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार मुंबईतील आणखी दोन जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार या दोघांना या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आणि अमेरिकेहून आलेल्या दोघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. या दोघांना कोणतीही लक्षणे नाहीत. हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात भरती आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या सहवासात आलेल्या लोेकांची शोध घेण्यात येणार आहे.

Web Title: Corona News Maharashtra another Two Omicron Patient 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here