महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ, पुण्यात ओमायक्रॉन नवे १३ तर राज्यात आढळले २३ रुग्ण
मुंबई | Corona News Update : राज्यात ओमायक्रॉन व्हेरीयंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण बनत आहे. आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात एकूण २२ नवे ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. तर राष्ट्रीय रसायन प्रयोग शाळेने १ नवा रुग्ण आढळल्याचा अहवाल दिला आहे.
या २३ रुग्णांपैकी १३ रुग्ण फक्त पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागात प्रत्येकी ३ रुग्ण आढळले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई मध्ये ५ तर उस्मानाबादेत २ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे, नागपूर, मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. नव्या २३ रुग्णांसह राज्याची ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णसंख्या ८८ वर पोहचली आहे. आजपर्यंत ८८ पैकी ४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Web Title: Corona News Update Omicron 23