Home महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; पहिला रुग्ण आढळला

राज्यात या जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; पहिला रुग्ण आढळला

Corona News Update Omicron in Kolhapur 

कोल्हापूर  | Corona News Update: राज्यात ओमिक्रॉन हळूहळू पाय पसरत आहे. राज्यात दिवसेंदिवस या वायरसची संख्या वाढतच चालली आहे. डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि विदर्भानंतर आता कोल्हापूरमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.

कोल्हापुरात ओमिक्रॉनचा पहिला संशयित रुग्ण आढळून आला आहे. ऑस्ट्रेलियामधून आलेल्या 45 वर्षीय नागरिकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोल्हापुरात एकूण 5 जण ऑस्ट्रेलियातून आले होते. त्यात 4 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संशयित रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहेत. त्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून जिल्ह्यात एकूण 432 जण आले आहेत. त्यापैकी 330 जणांची तपासणी पूर्ण झाली आहे. 300 जण निगेटिव्ह आले असून 30 जणांचे अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Corona News Update Omicron in Kolhapur 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here