Home Suicide News Ahmednagar: करोनाबाधीताची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न

Ahmednagar: करोनाबाधीताची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न

corona patient attempt to suicide in Ahmednagar hospital

अहमदनगर | Ahmednagar: नगर शहरातील गुलमोहर रोडवरील सुरभी हॉस्पिटलमध्ये एका करोनाबाधीताने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर रुग्णाला मार लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता ही घटना घडली.

सदर करोनाबाधित पाथर्डी तालुक्यातील आहे. गेल्या दहा दिवसांपासून शिरूर येथे एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी त्याच्यावर उपचार घेण्यासाठी सुरभी हॉस्पिटलमध्ये आला होता. मंगळवारी पहाटे साडे तीन वाजेच्या दरम्यान पळत जाऊन हॉस्पिटलची काच तोडून तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. ही घटना समजताच हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरु केले आहे. तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्या रुग्णाला जबर मार लागला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

See Latest Marathi News

Web Title: corona patient attempt to suicide in Ahmednagar hospital

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here