Home अहमदनगर संगमनेरमध्ये एक करोना बाधित अहमदनगरमध्ये संगमनेरसह आणखी तीन

संगमनेरमध्ये एक करोना बाधित अहमदनगरमध्ये संगमनेरसह आणखी तीन

संगमनेरमध्ये एक करोना बाधित अहमदनगरमध्ये संगमनेरसह आणखी तीन

अहमदनगर:  जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या आढळून आलेल्या बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे परगावी असलेले व्यक्ती आपल्या मूळ गावी परतत आहे. 

जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या ०३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह  असल्याचे स्पष्ट झाले आहे,  उर्वरित १६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले.

त्यात या तीन  व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात बाहेरील जिल्हयातून आलेल्या १९ व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत तर जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ७५ इतकी असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.

संगमनेर तालुक्यात केळेवाडी येथे घाटकोपर येथून आलेली ३२ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे.

बाधीत आढळून आलेल्या व्यक्तींमध्ये मुंबईतील भोईवाडा, परळ येथून नगर तालुक्यातील पिंपळगाव रोड, चास येथे आलेली २४ वर्षीय व्यक्ती, घाटकोपर येथून संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथे आलेली ३२  वर्षीय व्यक्ती आणि भाईंदर येथून श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे आलेल्या तीस वर्षीय महिलेचा समावेश आहे.

हे तिघेही मुंबई या शहरामधून आलेले पाहुणे आहेत. या पाहुण्यांमुळे अहमदनगर करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. आता यातील संपर्कातील व्यक्तींचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. 

Website Title: Coronavirus Ahmednagar with sangamner another three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here