Home अकोले अकोले तालुक्यात एकुण १२ व्यक्ती कोरोना बाधित

अकोले तालुक्यात एकुण १२ व्यक्ती कोरोना बाधित

Coronavirus Akole taluka 12 infected

अकोले | Coronavirus: अकोले तालुक्यात आज १२ व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्या आहेत. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ३७३ इतकी झाली आहे.

आज आलेल्या खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील महालक्ष्मी रोडवरील अगस्तीनगर येथे राहणाऱ्या ४८ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथील ६९ वर्षीय पुरुष, देवठाण येथील ५६ वर्षीय महीला,  कोतुळ येथील ६७ वर्षीय पुरुष अशी चार व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला. तर कोतुळ ग्रामीण रूग्णालयात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ब्राम्हणवाडा येथील ६८ वर्षीय पुरूष,  ६२वर्षीय महीला ८० वर्षीय पुरूष, ६८ वर्षीय महीला, चास येथील ३२ वर्षीय महीला अशी पाच तर देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये हिवरगाव आंबरे येथील ५० वर्षीय पुरूष व ०९ वर्षीय लहान मुलगा अश्या दोन व्यक्ती पॅाझिटीव्ह आल्यात तसेच संगमनेर येथील कोविड सेंटरच्या ॲन्टीजन टेस्टमध्ये तालुक्यातील चितळवेढे येथील ३० वर्षीय तरुणाचा अहवाल पॅाझिटीव्ह आला. तालुक्यात आज खाजगी प्रयोगशाळेत ०४ व ॲन्टीजन टेस्ट मध्ये ०८ अशी एकुण १२ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ३७३  झाली आहे.त्यापैकी २४५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे तर ०९ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ११९ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

See Latest Marathi News

Web Title: Coronavirus Akole taluka 12 infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here