Home अकोले Coronavirus: अकोले तालुक्यात २२ व्यक्ती कोरोना बाधित

Coronavirus: अकोले तालुक्यात २२ व्यक्ती कोरोना बाधित

Coronavirus Akole Taluka 22 infected

Coronavirus | अकोले: अकोले तालुक्यात सुरुवातीला ११ आणि नंतर ११ व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने करोनाबाधितांच्या संख्येत २२ ने भर पडली आहे, तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३२३ इतकी झाली आहे. तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथे तब्बल ८ करोनाबाधित आढळून आले आहेत.

मालपाणी लॅान्स येथे दिलेल्या स्वॅबच्या अहवालात तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथे ४० वर्षीय महीला, ४२ वर्षीय महीला, ७२ वर्षीय महीला, २१ वर्षीय महीला, ३५ वर्षीय पुरुष, २० वर्षीय तरुण, १५ वर्षीय   तरुण, व केवळ ०४ महिन्याच्या मुलीला करोनाची लागण झाली आहे. तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील के.जी. रोडवरील पेट्रोल पंपाच्या मागील ४८ वर्षीय पुरुष, हिवरगाव आंबरे येथील ५७ वर्षीय पुरुष व औरंगपूर येथे ४० वर्षीय महीला अशी एकुण ११ व्यक्ती कोरोना बाधित आली, तर खानापुर कोविड सेंटरमध्ये दिलेल्या स्वॅबचा अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात मेहंदुरी येथील ६८ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय पुरुष, २०वर्षीय तरुण, ४५ वर्षीय महीला, कोतुळ येथील ३० वर्षीय महीला, कळस येथील ३७ वर्षीय महीला, मनोहरपुर येथील ६० वर्षीय महीला, १२ वर्षीय तरुण, तर पिंपळगाव खांड येथे ३५ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महीला अश्या १० व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आले तर खाजगी प्रयोगशाळेत घोडसरवाडी येथील ७१ वर्षीय पुरुष पॅाझिटीव्ह आल्याने आज दिवसभरात तालुक्यातील २२ व्यक्ती कोरोना पॅाझिटीव्ह आल्या आहेत.

तालुक्यातील एकुण संख्या ३२३ झाली आहे. त्यापैकी २१८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. ९६ व्यक्तीवर उपचार सुरू आहे तर ८ व्यक्ती मयत झालेल्या आहे.

Website Title: Coronavirus Akole Taluka 22 infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here