Home नाशिक सिन्नरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, दोन रुग्ण सक्रीय

सिन्नरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, दोन रुग्ण सक्रीय

Coronavirus News:  दोन खाजगी रुग्णालयात दोन कोरोनासदृश रुग्ण.

Coronavirus re-introduced in Sinner, two patients are activeसिन्नर: राज्यासह देशभरात पुन्हा कोरोनाने डोक वर काढलेले असताना तालुक्यातही आज (दि. २६) एक कोरोना रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. येथील कानडी मळा परिसरात राहणारा ६० वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. वर्षा लहाडे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात पुन्हा कारोनाचा उपप्रकार असलेला एच१एन१ या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. सध्या वातावरणात गारवा निर्माण झाल्याने सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ख्रिसमस व नवीन वर्षांनिमित्त पर्यटन स्थळांवर गर्दी होत आहे. तसेच बाजारातही खरेदीसाठी गर्दी होत असल्याने पुढील काही

दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते असा अंदाज आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात सर्दी, खोकल्याच्या आजाराचे निदान करण्यासाठी आलेल्या या व्यक्तीची लक्षणे कोरोनाची आढळल्याने त्याची आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही कामाला लागली असून सर्दी, खोकला येत असल्यास ग्रामीण रुग्णालयात येऊन टेस्ट करण्याचे आवाहन अधिक्षिका लहाडे यांनी केले आहे.

शहरातील दोन खाजगी रुग्णालयातही दोन कोरोनासदृश रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Web Title: Coronavirus re-introduced in Sinner, two patients are active

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here