Home अहमदनगर संगमनेर: कुरण येथील महिलेला करोनाची लागण

संगमनेर: कुरण येथील महिलेला करोनाची लागण

Coronavirus/संगमनेर: संगमनेर शहरात आज सकाळी मोमीनपुरा व नाईकवाडपुरा येथे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आणखी एक कुरण येथील महिलेला करोनाची लागण झाली आहे.

कुरण येथील ८५ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याने संगमनेरची करोना बाधितांची संख्या १०० वर पोहोचली आहे. संगमनेर शहर व ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्याच बरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे.

तसेच सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात नगर शहरातील वाघ गल्ली व नालेगाव येथील आठ रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

Website Title: Coronavirus Sangamner kuran ladies corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here