Home संगमनेर संगमनेर तालुक्यात आज पुन्हा चार करोनाबाधित एकूण १६९

संगमनेर तालुक्यात आज पुन्हा चार करोनाबाधित एकूण १६९

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात काल १५ रुग्ण आढळून आले तर आज पुन्हा चार रुग्णांची भर पडली आहे. हे चारही रुग्णांचे तपासणी अहवाल खासगी प्रयोगशाळेतून करण्यात आलेले आहे.

यात निमगाव जाळी येथील एक २८ वर्षीय युवक करोनाबाधित आढळून आला आहे.

संगमनेर शहरातील ओरेंज कॉर्नर येथे ५९ वर्षीय पुरुष तर ७३ वर्षीय वयोवृद्ध महिला करोना बाधित आढळून आली आहे.

संगमनेर शहरातील गणेशनगर येथील ६५ वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाली असल्याचे खासगी अहवालद्वारे स्पष्ट झाले आहे. या सर्वांचे अहवाल हे खासगी प्रयोगशाळेमार्फत प्राप्त झाले आहेत.

त्यामुळे संगमनेर तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १६९ वर पोहोचली आहे. संगमनेर तालुक्यात वाढणारी करोनाची साथ चिंताजनक ठरत आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner taluka four corona infected News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here