Home अहमदनगर संगमनेरमध्ये करोना कहर: आणखी चार पॉझिटिव्ह एकूण ६१

संगमनेरमध्ये करोना कहर: आणखी चार पॉझिटिव्ह एकूण ६१

Coronavirus/संगमनेर: संगमनेरात आणखी चार करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे संगमनेर एकूण संख्या ६१ वर पोहोचली आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज एकूण ९ करोना बाधित आढळून आले आहेत. त्यात संगमनेरमधील चार  बाधित असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्याने २०० चा आकडा पार केला असून एकूण संख्या २०४ झाली आहे.

संगमनेर शहरात नवघर गल्ली येथील मटकाकिंगच्या संपर्कातून ४० वर्षीय व्यक्तीस करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नाईकवाडापुरा ६३ वर्षीय महिला,मोमिनपुरा ६५ वर्षीय महिला, दोडी दापूर संपर्कातील ५९ वर्षीय व्यक्ती असे चार पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामुळे संगमनेर तालुक्यासमोरील समस्या आणखी वाढल्या आहेत.

Website Title: Coronavirus Sangamner two positive Ahmednagar 200 reached

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here