Home अहमदनगर Raju Shetty: राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा

Raju Shetty: राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा

Crime against activists including Raju Shetty

अहमदनगर | Ahmednagar: करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांचे प्रतिबंधात्मक आदेश असताना परवानगी न घेता नगर शहरातून मोर्चा काढल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह त्यांच्या १५० कार्यकर्त्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल तनवीर शेख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. २० ऑगस्ट रोजी दुध दरवाढीसाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी मोर्चा काढला होता.

संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह १२५ ते १५० कार्यकर्त्यांचा मोर्चा घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी पोस्ट कार्यालयाजवळ अडविला.

जिल्ह्यात सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश आहेत. असे असतानाही मोर्चेकरांनी एकत्र येऊन विनापरवानगी सभा घेतली. प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.  

Web Title: Crime against activists including Raju Shetty

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here