Home अहमदनगर औषध बनावट आढळून आल्याने कृषी सेवा केंद्र चालकावर गुन्हा

औषध बनावट आढळून आल्याने कृषी सेवा केंद्र चालकावर गुन्हा

Crime against agricultural service center operator for forging drugs

कर्जत | Crime News: डाळिंब पिकासाठी दिलेले बायोसुल हे औषध बनावट आढळून आल्याने कृषी सेवा केंद्र चालक व औषध विक्रीसाठी उपलब्ध करून देणाऱ्याविरुद्ध ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथील शेतकरी प्रकाश गावडे व विनोद गावडे यांनी कृषी विभागाकडे तक्रार देऊन त्याचा पाठपुरावा केला होता. तपासातून सर्व बनावटगिरी उघड झाल्याने कर्जत पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

बायोसुल नावाचे बनावट औषध पुरविणारे आणि विकणारे नंदराज अहिरे, यश ॲग्रो कन्सल्टन्सी, मिरजगाव तसेच हे औषध त्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देणारे लक्ष्मीकांत हुमे दोघेही रा. मिरजगाव यांच्या विरोधात कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोघांनी विकलेल्या बायोसुल या बनावट औषधाच्या डाळिंब पिकावरील फवारणीमुळे फळांची मोठ्या प्रमाणात गळ झाल्याची तक्रार कृषी विभागाकडे करण्यात आली होती.

यामधून  शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्या औषधाची कंपनी प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. या याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे हे करत आहेत.

Web Title: Crime against agricultural service center operator for forging drugs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here