Home क्राईम संगमनेरमध्ये धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले

संगमनेरमध्ये धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले

Sangamner Crime: ५० हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी ओरबाडून नेले (Theft).

Crime Dhoomstyle scratched the Mangalsutra from the woman's neck

संगमनेर: महिलेच्या गळ्यातील सोन्याचे ५० हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी ओरबाडून नेले. बुधवारी (दि.५) सकाळी साडेदहाच्या सुमारास अकोले बायपास येथे ही घटना घडली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मोहन मोरे (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी मोहन मोरे यांच्या पत्नी संगीता मोरे यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र ओरबाडत तेथून वेगात मोटरसायकल नेली. अकोले बायपास येथील एका किराणा दुकानाजवळ ही घटना घडली. दुकानदाराने याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर गस्तीवर असलेले शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल आशिष आरवडे, धनंजय महाले, अविनाश बर्डे, राम मुकरे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. चोरटे गेलेल्या दिशेने पोलीस पथक रवाना झाले. घटनास्थळ तसेच चोरटे गेलेल्या दिशेने असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Crime Dhoomstyle scratched the Mangalsutra from the woman’s neck

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here