Home क्राईम लग्नानंतर काहीच दिवसात समजलं पत्नीचं धक्कादायक सत्य, कोर्टात धाव

लग्नानंतर काहीच दिवसात समजलं पत्नीचं धक्कादायक सत्य, कोर्टात धाव

Jalgaon Crime: महिला असल्याची बतावणी करणाऱ्या तृतीयपंथीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश.

Crime has been registered against a third party pretending to be a woman

जळगाव:  फेसबुकवर एका तरुणासोबत मैत्री करून एका तृतीयपंथीने महिला असल्याचं त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यानंतर लग्न करून त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  गिरणा पंपीग रोड परिसरात राहणाऱ्या तरूणाची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी महिला असल्याची बतावणी करणाऱ्या तृतीयपंथीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत.

फसवणूक झालेला तरुण जळगाव शहरातील गिरणा पंपीगरोड परिसरात राहतो. तरूणाची फेसबुकवर एका तरूणीशी ओळख झाली. आई-वडील अपघातात वारले असल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर ओळखीनंतर अवघ्या काही दिवसात म्हणजेच 29 एप्रिल 2023 रोजी महिलेनं त्या तरूणाशी लग्न केलं. काही दिवसात हळूहळू त्या तरूणीच्या हालचाली वेगळ्या वाटू लागल्या. तसंच ती तरूणाला स्पर्शही करू देत नसल्याने तरूणाची शंका वाढत गेली.

लग्नाच्या काही दिवसानंतर तरुणाने तिला डॉक्टरांकडे तपासणीला नेलं असता आपली पत्नी तृतीयपंथी असल्याचं उघडकीस आले. त्यानंतर महिला असल्याचा बनाव करणाऱ्या तृतीयपंथीने तरूणाकडे 10 लाखांची मागणी केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तृतीयपंथीने एका ॲपवर आणि सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या नावाने अकांऊट उघडले असल्याचंही लक्षात आलं.

यामध्ये अनामिका, सोनू, दिव्या, सोनल या नावांचा समावेश होता. हा प्रकार घडल्यानंतर तरूणाने जळगाव पोलीस अधीक्षक आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . शिवाय जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात देखील याचिका दाखल केली. न्यायालयात या प्रकरणावर कामकाज झालं आणि आता न्यायालयाने आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Crime has been registered against a third party pretending to be a woman

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here