Home संगमनेर Crime: नुपूर शर्मावर संगमनेरात गुन्हा दाखल

Crime: नुपूर शर्मावर संगमनेरात गुन्हा दाखल

Crime has been registered against Nupur Sharma at Sangamner

Sangamner Crime | संगमनेर: मोहंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्हे विधान करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहरकाजी सय्यद अब्दुल रकीब अब्दुल वहाब परीजादे वय ५० रा. मोमिनपुरा यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करीत आहे. येत्या शुक्रवारी संगमनेरातील मुस्लीम बांधव शर्मा यांचा वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढणार होते. मात्र स्थानिक पोलिसांनी देशातील सद्यस्थितीचा विचार करता असा कोणताही प्रकार ना करण्याची केलेली विनंती मुस्लीम समाजाने मान्य केली आहे. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा अहमदनगर जिल्ह्यात त्यांच्या विरोधात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.  

Web Title: Crime has been registered against Nupur Sharma at Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here