पोलीस भरतीचा पेपर फुटल्याबाबत सोशियल मेडीयावर अफवा पसरविणाऱ्या तरुणावर गुन्हा
अहमदनगर | Crime News: मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटल्याबाबतची अफवा सोशल मिडीयावर पसरवून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या तरूणावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश दिलीप पोटे (वय 26 रा. बारादरी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रविवारी मुंबई पोलीस भरतीचा पेपर झाला. तत्पूर्वी पोटे याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केले की, मुंबई पोलीस पदाची होणारी लेखी परीक्षा 14 नोव्हेंबरला राज्यात विविध केंद्रावर होणार आहे. अहमदनगर वरील काही केंद्रावर मुंबई पोलिसांचा पेपर फोडण्याच्या बातम्या येत आहेत. तरी यावर आपण तातडीने कारवाई करावी, अशी विनंती असे ट्विट केले होते.
निलेश पोटे याने विद्यार्थांमध्ये भय व संभ्रम पसरवून असंतोष किंवा भयग्रस्त वातावरण निर्माण केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश दिलीप पोटे (वय 26 रा. बारादरी ता. नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime News against a youth who spread rumors on social media