Home अहमदनगर तरुणीने पती व मुले असताना देखील एका तरुणासोबत लग्न करून घातला एक...

तरुणीने पती व मुले असताना देखील एका तरुणासोबत लग्न करून घातला एक लाखास गंडा

Crime News Ahmedagar Marriage fraud

अहमदनगर | Crime News: पती व दोन मुले असतानाही दुसरे लग्न करून तरुणाची एक लाखाची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणीसह तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी सागर दिलीपलाल भंडारी (रा. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून कावेरी शांती लिंगायत (वय 31 रा. सोलापूर) असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिला अटक  केली आहे.  न्यायालासमोर उभे केले असता न्यायालयाने 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दुर्गेे यांनी दिली.

तिच्या सोबत असलेले बसवराज (पूर्ण नाव माहिती नाही) व भारती रवींद्र झाडमुथ्या (रा. बीड) या दोघांवरही गुन्हा दाखल झाला असून हे दोघे फरार झाले आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कावेरी लिंगायत या तरुणीचे पहिले लग्न झालेले होते. तिला दोन मुले आहेत. असे असून देखील तिने वरील दोघांच्या मध्यस्थीने फिर्यादी सागर भंडारी यांच्यासोबत लग्न केले. त्यांच्याकडून एक लाख रुपयांची रक्कम घेतली. परंतु, सागर यांना तिच्या पहिल्या लग्नाची माहिती समजताच  त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दुर्गे हे करीत आहेत.

Web Title: Crime News Ahmedagar Marriage fraud

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here