अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गरोदर असल्याचे निदर्शनास आल्याने आरोपी अटकेत
अहमदनगर | Crime News: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून गरोदर राहिल्याने ही घटना समोर आली आहे. तिच्यावर अत्याचार करणार्या तरूणाविरोधात भिंगार कॅम्प पोलीस अत्याचार, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश राजेंद्र सपकाळ रा. भिंगार असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी 28 सप्टेंबर रोजी घरातून निघून गेली असल्याची तक्रार तिच्या आईने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तिला शिर्डी येथुन ताब्यात घेतले. तिने घरी राहण्यास नकार दिल्याने पोलिसांनी तिला बालसुधारगृहात ठेवले. तिच्या आईने तिला घरी नेले. घरात वाद झाल्यामुळे ती घरातून निघून गेली. पोलिसांनी पुन्हा तिचा शोध घेऊन तिला बालसुधारगृहात पाठविले.
दरम्यान, बालसुधारगृहात तिची तपासणी करण्यात आली असता ती गरोदर असल्याचे निदर्शनास आले. बाल कल्याण समितीकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सपकाळ याच्यासोबत तिचे संबंध आल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी सपकाळविरोधात गुन्हा दाखल करत त्यास अटक केली.न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके हे करीत आहे.
Web Title: Crime News Ahmednagar Abuse of a minor girl