Home अहमदनगर हिला आज खपवून टाक, विवाहितेला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

हिला आज खपवून टाक, विवाहितेला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

Crime News Attempt to kill a married woman by strangling her

अहमदनगर | Ahmednagar Crime News: विवाहितेचा गळा आवळून व तिला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रकार ७ डिसेंबर रोजी नगर तालुक्यातील घोसपुरी परिसरातील घोडकेवाडीत घडली. याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलसांनी महिलेचा पती राहुल बबन घोडके व नणंद मीना संजय झरेकर रा. घोसपुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडित विवाहिता ही पती व मुलांसह सासरी नांदत होती. कौटुंबिक वादातून पीडितेने 2020 साली महीला दिलासा केंद्रात पती राहुल व नंणद सविता व मिना या मानसिक व शारीरीक छळ करत असल्याची तक्रार दिली होती.

मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींनी पीडितेच्या वडीलांची समजूत काढून तिला पुन्हा नांदविण्यास नेले होते. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी सायंकाळी पीडिता ही गायींना खुराक चारत असताना तिची नणंद मीना हिने माझ्या गायांना खुराक चारु नको, मी माझी चारीन, असे सांगितले.

यावेळी तिच्या पतीने पीडितेच्या अंगावर धावून जात तिच्या शर्टची कॉलर आवळून तिचा गळा दाबला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर पोडितेच्या तोंडात जबरदस्तीने औषध ओतले. यावेळी नणंद मीना हिने हिला आज खपवून टाक, हिचं खूप झालं आहे, असे म्हणत नवर्‍याला प्रोत्साहन दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक यु. ए. चव्हाण करत आहेत.

Web Title: Crime News Attempt to kill a married woman by strangling her

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here