Home अहमदनगर धक्कादायक: चक्क पोलीस कर्मचाऱ्यानेच जप्त केलेल्या मुद्देमालाचा केला अपहार

धक्कादायक: चक्क पोलीस कर्मचाऱ्यानेच जप्त केलेल्या मुद्देमालाचा केला अपहार

Crime News Embezzlement of confiscated material by police

अहमदनगर | Crime News: नगर तालुका पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यानेच गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल फायनान्स बँकेत तारण ठेवत त्यावर कर्ज काढून ५ लाख ४६ हजार ६४० रुपये स्वतःच्या फायद्यासाठी खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलीस नाईक गणेश नामदेव शिंदे नगर तालुका पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी फिर्याद दिली असून भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर तालुका पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या पोलीस कर्मचार्याकडे पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांतील हस्तगत मुद्देमालाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

या कर्मचाऱ्याने जवळ असलेल्या मुदेमालातील सोन्याचे दागिने स्वतःच्या मालकीचे नसताना देखील एका फायनान्स कंपनीत तारण ठेऊन त्यावर कर्ज काढून ५ लाख ४६ हजार ६४० रुपये स्वतःसाठी खर्च करून न्यायालयाचा विश्वासघाट करत अपहार केला आहे. ही बाब उघडकीस अल्यानंतर नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.  

Web Title: Crime News Embezzlement of confiscated material by police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here