संगमनेर: पत्नीचे नाजूक संबंध पतीची सासरवाडीत जाऊन आत्महत्या
संगमनेर | Crime News: संगमनेरमध्ये विवाहबाह्य संबंधामुळे वैवाहिक जीवन उद्वस्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे.
पतीच्या मोबाईलवर एका दुखी प्रियकराने तिच्याशी असलेल्या संबंधाची चाट व व्हिडियो क्लीपच्या पुराव्यासह व्हाटस अप वर पाठविल्याने पत्नीविषयी मनात द्वेष, राग निर्माण झाल्याने पत्नीला जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीवरच तिने आरोप करीत घटस्फोटाची मागणी केली. पतीने पत्नीच्या व तिच्या पालकांना कंटाळून नुकतेच मध्यरात्री सासूरवाडीत जाऊन विष केले. त्यास बेशुद्ध अवस्थेत एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले नंतर घोटी येथे हलविण्यात आले. उपचार सुरु असताना नुकतेच त्याचे निधन झाले.
याप्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक वर्ष वयाचा मुलगा असताना पत्नीचे माहेरी असलेले नाजूक संबंध प्रियकराने पतीच्या मोबाईलवर पुराव्यासह पाठविल्याने झालेल्या वादातून नाशिक जिल्ह्यातील एका गावातील एका व्यक्तीने संगमनेरात सासुरवाडीत जाऊन विष प्राशन करून आत्महत्या करत जीवन संपविल्याची घटना घडली आहे.
Web Title: Crime News Husband commits suicide by going to Sasarwadi