Home क्राईम Crime News: संगमनेर तालुक्यात ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

Crime News: संगमनेर तालुक्यात ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

crime news Sangamner Crime filed against Gram Sevak

संगमनेर | Crime News: तालुक्यातील हंगेवाडी संबंधित ग्रामसेवकाने प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातमीचा मनात राग धरून अमोल शेळके यास मारहाण केल्याची घटना घडली आहे. अमोले शेळके याने आश्वी पोलीस ठाण्यात ग्रामसेवक भाऊसाहेब दराडे याच्याविरोधात तक्रार दिली त्यावरून आश्वी पोलिसांनी अदखलपात्र  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हंगेवाडी ग्रामपंचायतचे भाऊसाहेब दराडे यापूर्वीही वादात सापडले होते. नळाला पाणी येत नसल्याची तक्रार घेऊन महिला गेल्या असता ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्यावर ग्रामस्थांनी हंगेवाडी सरपंचाना ग्रामस्थांशी असभ्य भाषेत बोलणाऱ्या ग्रामसेवकाची लेखी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली होती तसेच प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीसाठी माहिती दिली होती. त्यानंतर ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. हंगेवाडीचे ग्रामस्थ अमोल शेळके यांनी अर्जाचे काम कुठपर्यंत आले अशी चौकशी केली असता ग्रामसेवक दराडे यांनी अमोल शेळके यांना विचारणा केली की, आपण माझ्या विरोधात प्रसार माध्यमांना बातमी का दिली. त्यावर अमोल शेळके यांनी सांगितले की, मी एकट्याने बातमी दिली नसून गावातील ग्रामस्थांच्या त्याच्यावर सह्या आहेत असे शेळके यांनी सांगितले.   

Web Title: crime news Sangamner Crime filed against Gram Sevak

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here