Home अहमदनगर Crime News: चिमुरडीबरोबर अनैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न, आरोपीस अटक

Crime News: चिमुरडीबरोबर अनैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न, आरोपीस अटक

Crime News Trying to have unnatural sex with Chimurdi

कोपरगाव | Crime News: कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात एका कॉलनीत दुपारच्या वेळी घरासमोर अंगणात खेळत असणाऱ्या एका पाच वर्षाच्या बालिकेला पैसे देतो असे आमिष दाखवून आरोपीने घरात बोलावून त्या चिमुरडीबरोबर अनैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दिलीप रामेश्वर पासवान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करून न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रविवार दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता चिमुरडी आपल्या घरासमोर खेळत असताना आरोपी दिलीप रामेश्वर पासवान मूळ रा.कठणपूर, ता. बेडम, जि. रोहताज, बिहार (सध्या कोपरगाव शहर) याने तिला पैसे देण्याचे आमिष दाखवून घरात बोलावून त्या चिमुरडीबरोबर नैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अत्याचारित मुलीच्या आईने कोपरगाव शहर पोलिसांत फिर्याद दिली.

आरोपी विरोधात बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमव्दारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दाते हे करीत आहेत.

Web Title: Crime News Trying to have unnatural sex with Chimurdi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here