Home अकोले अकोले तालुक्यात रेशन चोरीप्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यासह आणखी एकास अटक

अकोले तालुक्यात रेशन चोरीप्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यासह आणखी एकास अटक

Crime News Two arrested in Akole taluka

अकोले | Crime News: अकोले तालुक्यातील रेशन घोटाळाप्रकरणी अकोले पोलिसांनी आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. मंगळवारी रात्री पोलिसानी अकोले शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असणार्‍या संदीप भानुदास शेणकरसह कोतूळ येथील शिवाजी मारुती मुठे यास अटक केली आहे.

अकोले शहरालगत असलेल्या नवलेवाडी येथे 2 नोव्हेंबर 21 रोजी एका घरामध्ये व आयशर टेम्पोत रेशनिंगचे 182 कट्टे सह वाहन असा 9 लाख 80 हजार रुपयाचा मुद्दे माल जप्त करून दत्ता सुदाम चोथवे व खंडु काशिनाथ भारमल याच्या विरोधात अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता

अकोले तालुक्यात चार महिन्यांपूर्वी राजूर पोलीस स्टेशन समोर अवैद्य रेशन भरलेल्या तीन गाड्या पकडून गुन्हा दाखल करण्याची व त्यानंतर ऐन दिवाळीत नवलेवाडी येथे रेशनिंगचा तांदूळ पकडल्याची घटना घडली होती.

महाराष्ट्र शासनाने मोफत वितरणासाठी दिलेल्या तांदळाच्या गोण्यांची जागेवर आदला बदल करून तांदूळ अवैध साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगले व तिथून पसार झाले या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी दत्ता चोथवे व खंडू भारमल यांच्याविरोधात गुन्हा रजि.442/202 अत्यावश्यक वस्तू कायदा अधिनियम 1955 चे कलम 317 प्रमाणे यापूर्वी गुन्हा दाखल केला होता. तर अन्य आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत होते.  अकोले पोलिसांनी उशिरा का होईना या प्रकरणी शिवाजी मारुती मुठे (वय-40,रा कोतूळ,ता अकोले) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या संदीप भानुदास शेनकर (वय 39,रा कारखाना रोड,अकोले) यांना मंगळवारी रात्री अटक केली आहे. पुढील  तपास सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे करत आहेत.

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी  संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Crime News Two arrested in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here