Home अहमदनगर Crime News: दोन महिलांना लोखंडी पाईपने मारहाण

Crime News: दोन महिलांना लोखंडी पाईपने मारहाण

Crime News Two women beaten with iron pipes

राहुरी | Crime News: शहरातील बाजारपेठेत दुकान लावण्याच्या कारणावरून दोन महिलांना मारहाण व हाणामारीची घटना घडली आहे. यावेळी दोन महिलांना लोखंडी पाईपने व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत.

आशा संतोष पटारे वय ४० रा. तनपुरेवाडी रोड राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की, सौ. आशा पटारे या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. सौ.आशा पटारे यांची आई गोदाबाई शेटे या दिनांक ३ नोव्हेंबर रोजी शहरातील भागिरथी शाळा रोड लगत रुद्राक्ष मोबाईल दुकान समोर भाजीपाला विक्री करत होत्या.

यावेळेस आरोपी अमोल बाबासाहेब थोरात, उमेश बाबासाहेब थोरात तसेच एक पप्पू नामक तरूण हे त्या ठिकाणी आले. आणि सौ. आशा पटारे यांना म्हणाले कि, तुम्ही येथे भाजी विक्री दुकान लावायचे नाही असे म्हणुन शिवीगाळ केली तेव्हा सौ. आशा पटारे त्यांना म्हणाल्या की तुम्ही माझी आई व भाऊला शिवीगाळ का करता शिवीगाळ करू नका असे म्हणाल्याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी सौ. आशा पटारे यांचे आईला शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्क्यांने मारण्यास सुरूवात केली. तेव्हा सौ. आशा पटारे त्यांचे भांडणे सोडवण्यासाठी गेल्या असता अरोपींनी त्यांना लोखंडी पाईपने व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली.

फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी अमोल बाबासाहेब थोरात, उमेश बाबासाहेब थोरात दोघे रा. तनपूरेवाडी रोड तसेच एक पप्पू नामक तरूण या तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक  तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Crime News Two women beaten with iron pipes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here