Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील गुन्हेगारी टोळीवर हद्दपारची कारवाई

संगमनेर तालुक्यातील गुन्हेगारी टोळीवर हद्दपारची कारवाई

Criminal gang deported from Sangamner taluka

Sangamner | संगमनेर: अहमदनगर जिल्ह्यात संघटीतपणे टोळी करून गुन्हेगारी कृत्य करणार्‍या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची (Deported) कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी देत याबाबत आदेश काढले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम, मालुंजे (ता. संगमनेर) येथील संदीप घुगे याचा यामध्ये समावेश आहे. सराईत गुन्हेगारांना हद्दपार केल्यामुळे त्यांच्या गुन्हेगारी कृत्याला आळा बसणार आहे.

संगमनेर तालुक्यात दहशत निर्माण करणार्‍या घुगे टोळीला संगमनेर, राहुरी आणि राहाता तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. टोळीप्रमुख संदीप भाऊसाहेब घुगे (वय 39), मारूती सगाजी नगरे (वय 62), विजय बच्चू डोंगरे (वय 44), अमोल सोमनाथ डोंगरे (वय 28), दीपक सोमनाथ डोंगरे (वय 27) आणि शशिकांत उर्फ मंगेश शिवाजी नागरे (वय 22, सर्व रा. मालुंजे, ता. संगमनेर) यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. टोळीविरूद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत.

संघटितपणे टोळी तयार करून मारहाण (Beaten) करत दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, रक्कम बळजबरीने काढून घेणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे (threaten), महिलांसोबत गैरवर्तन करणे (molestation), धार्मिक भावना दुखावणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, अनाधिकाराने मालमत्तेचे नुकसान करणे असे गंभीर गुन्हे (Crimes) दाखल असलेल्या सराईत आरोपींविरूध्द अधीक्षक पाटील यांनी हद्दपारीची कारवाई करून गुन्हेगारांना दणका दिला आहे.

Web Title: Criminal gang deported from Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here