Home सांगली लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली क्रुझर लक्झरी बसवर आदळली, ७ जणांचा मृत्यू

लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली क्रुझर लक्झरी बसवर आदळली, ७ जणांचा मृत्यू

Breaking News | Sangli Accident: भरधाव क्रुझर पाठीमागून ट्रॅव्हलर्सवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात कुझरमधील सातजण जागीच ठार.

Cruiser carrying wedding bride and groom collides with luxury bus, 7 killed

सांगली : भरधाव क्रुझर पाठीमागून ट्रॅव्हलर्सवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात कुझरमधील सातजण जागीच ठार झाले. सांगलीतील विजापूर-गुहागर महामार्गावर जांभुळवाडीनजीक (ता. कवठेमहांकाळ) येथे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, क्रु झरचा चक्काचूर झाल्यानंतर पेट घेतल्याने मदत कार्यात अडथळे आले. क्कु झरचे तोंड निम्मे ट्रॅव्हलर्समध्ये घुसले होते. घटनास्थळी हाडामासांचा चिखल तसेच रक्ताचा सडा पडला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, विजयपूर -गुहागर महामार्गावर सांगली जिल्ह्यातील जतवरून येणाऱ्या जत- मुंबई ट्रॅव्हल्सला क्रूजर गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात क्रूजरमधील पाच जणांचा  जागीच मृत्यू झाले तर २ जणांनी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच अंतिम श्वास घेतला. क्रुझर जीपमधून लग्नाचे वऱ्हाड होते. या जीपमधून लोक खच्चून भरली होती. यामधून १८ ते २० जण प्रवास करत होते. विजयपूर-गुहागर महामार्गावर आल्यानंतर जीपने सांगली जिल्ह्यातील जतकडून मुंबईकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. जीप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जीप लक्झरी बसवर जाऊन आदळली.

अपघातस्थळाचा दृष्य खुपच भीषण होते. क्रुझरने बसला दिलेली धडक इतकी भीषण होती की, क्रुझर जीपच्या पुढच्या भागाचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला होता. या अपघातात चालकासह पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

जीपमध्ये मागच्या सीटवर बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यांना स्थानिकांनी तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. क्रुझरमधील सर्वजण सावर्डेकडे लग्नकार्यासाठी जात होते. मात्र, लग्ना समारंभात पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर काळाने घाला घातला. जखमींपैकी ४ ते ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Cruiser carrying wedding bride and groom collides with luxury bus, 7 killed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here