Home अहमदनगर अहमदनगर: ऊसाच्या शेतात गांजाची लागवड, 12 लाखांचा गांजा हस्तगत

अहमदनगर: ऊसाच्या शेतात गांजाची लागवड, 12 लाखांचा गांजा हस्तगत

Ahmednagar News: शेतकर्‍याने  ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर पारनेर पोलीसांच्या पथकाने छापा (Raid) टाकला, 250 किलो गांजा पोलीसांनी हस्तगत केला.

Cultivation of ganja in sugarcane fields, Raid seizure of ganja worth 12 lakhs

पारनेर | Parner: तालुक्यातील गुणोरे येथे एका शेतकर्‍याने  ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर पारनेर पोलीसांच्या पथकाने बुधवारी (दि.12) दुपारी छापा  टाकला. या शेतामधून सुमारे 12 लाख रूपये किंमतीचा 250 किलो गांजा पोलीसांनी हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी दोन शेतकरी भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितील उर्फ गोट्या रामदास गोपाळे व बाळू रामदास गोपाळे (रा. कारखिले मळा, गुणोरे, ता. पारनेर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून यातील बाळु गोपाळे यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार गाडीलगांव रस्त्यावर गोपाळे यांची सुमारे वीस एकर शेती आहे. त्या शेतीमधील उसाच्या शेतात गांजाची शेती करण्यात येत होती. या शेतीच्या आजूबाजूने इतर कोणीही जात नसल्याने गोपाळे यांचा हा उद्योग सहीसलामत सुरू होता. मात्र गुप्त बातमीदाराने गोपाळेंच्या या उद्योगाची पोलखोल केल्यानंतर पोलीसांनी बुधवारी दुपारी  दोन वाजण्याच्या सुमारास पोलीसांच्या फौजफाटयासह जावून कारवाई केली.

गुणोरे येथील गाडीलगांव रस्त्यावरील मळयात गोपाळे यांच्या ऊसाच्या शेतात गांजाची शेती करण्यात येत असल्याची माहीती गुप्त बातमीदारामार्फत पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. यानंतर गायकवाड यांनी पोलीसांचे पथक तयार करून गोपाळे यांच्या मळयात छापा टाकला. ऊसाच्या शेतात पाहणी करण्यात आली असता तेथे सरीमध्ये गांजाच्या झाडांचे संवर्धन करण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलीसांनी गांजाची संपूर्ण झाडे तोडून ती जप्त केली. याप्रकरणी बाळू रामदास गोपाळे यास ताब्यात घेण्यात आले असून उशिरापर्यंत पंचनामा तसेच फिर्याद दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

Web Title: Cultivation of ganja in sugarcane fields, Raid seizure of ganja worth 12 lakhs

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here