अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले अन घडले असे काही
अहमदनगर | Cyber Crimes: अनोळखी व्यक्तीने रात्री फोन करून जियो प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगत मोबाईलमध्ये एक अॅप डाऊनलोड होताच तक्रारदाराच्या बँक खात्यातून १ लाख रुपये लंपास करत फसवणूक केल्याची घटना १२ जुलै रोजी घडली.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात शरद माणिक कापकर रा. केडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कापकर यांना १३ जुलै रोजी रात्री एका अज्ञात व्यक्तीने फोन करत जियो प्रतिनिधी असल्याचे सांगितले. त्याने कापकर यांना त्यांच्या मोबाईलमध्ये एनी डिस्क अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर कापकर यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ९८ हजार ९९९ रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक भोसले हे करीत आहे.
Web Title: Cyber Crimes asked you to download the app