Home अहमदनगर Accident: ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून ऊस तोडणी मजुराच्या मुलीचा मृत्यू

Accident: ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून ऊस तोडणी मजुराच्या मुलीचा मृत्यू

daughter of a sugarcane harvester was found dead under the wheel of a tractor Accident

Ahmednagar | माळवाडगाव | Malvadgav:  ऊस वाहतूक करणार्‍या चालत्या ट्रॅक्टरवरून पडून डोक्यावरून चाके गेल्याने मुलीचे अपघाती (Accident) निधन झाले.  निकीता विजय कसबे (वय 14, मु. पो. मसाई गोरी तांडा, ता. अंबड) या ऊस तोडणी मजुराच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. माळवाडगाव येथे बुधवारी रात्री 10.30 वाजता ही घटना घडली.

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी मुकादम अशोक किसन पटुळे यांच्या टोळीतील ऊस तोडणी मजूर माळवाडगाव शिवारात ट्रॅक्टर जुगाडने ऊस तोडणी करून वाहतूक करतात. हे मजुर लहान मुले कुटुंबासह ट्रॅक्टरवरच येतात व जातात. काल बुधवार दि.20 एप्रिल रोजी माळवाडगाव येथील खडकवस्ती रस्त्याने उसाने भरलेले ट्रॅक्टर जुगाड घेऊन कारखान्याकडे जात असताना ट्रॅक्टरवर पुढे बसलेल्या निकीता कसबे ही तोल जाऊन खाली पडली. त्यावेळी प्रथम मोठा टायर व नंतर भरलेल्या जुगाडचे टायर डोक्यावरून गेल्याने तिचे जागीचे प्राण गेले.

माळवाडगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहीकेतून तिला तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टररांनी घोषीत केले. ऊस तोडणी धांदलीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेने माळवाडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: daughter of a sugarcane harvester was found dead under the wheel of a tractor Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here