Home महाराष्ट्र एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले

एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले

Satara News: एकाच कुटुंबातील चार जण राहत्या घरी मृत्युमुखी पडल्याची घटना, हत्या की आत्महत्या (suicide) याबाबत तर्कवितर्क.

Dead bodies of four members of the same family were found

पाटण | सातारा:  सणबूर (ता. पाटण) येथे गुरुवारी रात्री एकाच कुटुंबातील चार जण राहत्या घरी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण ढेबेवाडी विभाग हादरला असून, ही हत्या की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

सणबूर (ता. पाटण) येथील निवृत्त शिक्षक आनंदा पांडुरंग जाधव (वय ७५), पत्नी सुनंदा आनंदा जाधव (वय ६५), मुलगा संतोष आनंदा जाधव (वय ४५) व विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (रा. मंदुळकोळे, ता. पाटण) हे चार जण झोपलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आले.

काही दिवसांपासून आनंद जाधव हे आजारी होते. गुरुवारी त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. राहत्या घरीच त्यांना ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी, मुलगा व मुलगी असे चौघे जण होते.  हत्या की आत्महत्या याबाबत तपास सुरु आहे.

Web Title: Dead bodies of four members of the same family were found

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here