२५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, अपघात की घातपात?
Beed Crime News: गेवराई शहरात 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली, खून झाला की आत्महत्या (Suicide) याबाबत पोलीस तपास करीत आहे.
बीड: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक गंभीर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. बीडमधून अशीच एक घटना समोर आली आहे. बीडच्या गेवराई शहरात 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या गेवराई शहरात 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील संजय नगर भागात असणाऱ्या एका लिंबाच्या झाडाखाली हा मृतदेह आढळून आला आहे. सचिन साहेबराव चव्हाण वय 25 रा.सुशी तांडा ता.गेवराई असे मयत तरुणाचे नाव आहे.
या घटनेची माहिती कळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, घटनेची माहिती घेत पंचनामा केला. दरम्यान मयत सचिन चव्हान याचा खून झालाय की आत्महत्या केली ? याचा तपास गेवराई पोलीस करत आहेत.
Web Title: dead body of a 25-year-old youth was found, an accident or Suicide
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App