Home अहमदनगर संगमनेरात विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

संगमनेरात विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Breaking News | Sangamner: मालपाणी लॉ कॉलेज समोरील एका विहिरीत महिलेचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याने खळबळ उडाली.

Dead body of a woman was found in a well in Sangamner

संगमनेर: संगमनेर नाशिक-पुणे महामार्गावरील मालपाणी लॉ कॉलेज समोरील एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर महिलेने आत्महत्या केली कि काही घातपात झाला. याबाबत शहर पोलीसांनी तपास सुरू केला आहे.

रूपाली धनंजय सातपुते (वय ४५) या महिलेचा मृतदेह लॉ कॉलेज समोरील विहिरीत आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आढळून आला, महामार्ग परिसर महाविद्यालय परिसर आल्याने घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरीक जमा झाले. विहिरीत बाज टाकून या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शहर पोलीसांनाही घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कटिज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे

दरम्यान या महिलेने आत्महत्या केली की या पाठीमागे आणखी काही कारण आहे याचा अधिक  सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.

Web Title: Dead body of a woman was found in a well in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here