Home जळगाव तरुणीचा मृतदेह ग्रामपंचायतीजवळ विहिरीत आढळून आल्याने खळबळ

तरुणीचा मृतदेह ग्रामपंचायतीजवळ विहिरीत आढळून आल्याने खळबळ

Jalgaon Found Dead Body: अल्पवयीन तरुणीचा मृतदेह गावातील ग्रामपंचायतीजवळ असलेल्या विहरीत आढळून आल्याची धक्कादायक घटना.

Dead body of a young woman was found in a well near the village panchayat

जळगाव:  तालुक्यातील मोहाडी गावात बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा मृतदेह (Dead body) गावातील ग्रामपंचायतीजवळ असलेल्या विहरीत आढळून आल्याची धक्कादायक घटना रविवारी 18 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

पुजा भीमराव पवार (वय २६, रा. मोहाडी) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुजा भीमराव पवार ही तरुणी मोहाडी येथे परिवारासह राहत होती. १७ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरात सर्व जण झोपलेले असतांना तरुणी घरातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास तरुणीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नसल्याने कुटुंबियांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावातील ग्रामपंचायत जवळील विहरीमध्ये ग्रामस्थांना तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसून आला. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, रतीलाल पवार, सुद्धोधन ढवळे, जितेंद्र राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह विहरीतून बाहेर काढला.

Earn Money online | फेसबुक वरून कसे पैसे कमवितात | How to earn money from facebook in Marathi

यावेळी ही तरुणी गावातीलच असल्याने तिची ओळख पटविली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Dead body of a young woman was found in a well near the village panchayat

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here