Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: चरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर ब्रेकिंग: चरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Ahmednagar | Rahuri: कुजलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह, (Dead body) परिसरात खळबळ.

Dead body of an unknown person was found in the pasture

देवळाली प्रवरा: देवळाली प्रवरामधून एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. येथिल महादेव व शनी मंदिराजवळील साई मंदिरा शेजारी असलेल्या चरात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

साईमंदिरा शेजारी पाण्याचा चर आहे. या चरामध्ये नशेत असलेला अंदाजे 30 ते 35 वर्ष वयाचा अनोळखी इसम शौचास जात असतांना पाय घसरुन पाण्याने वाहत्या चरात पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण त्याने अंगात घातलेली पँट देखील कंबरेच्या खाली ओढलेली तशीच आहे. नशेमुळे त्याला पाण्यातून बाहेर पडता आले नाही व तेथेच त्याचा गुदमरुन मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने ही घटना तीन ते चार दिवसापुर्वी झाली असावी. सकाळी मंदिराचे पुजारी यांना कसला तरी घाणवास येत असल्याने त्यांनी मंदिरामागे जावून पाहिले असता त्यांना चरा मध्ये एका इसमाचा मृतदेह पालथा पडलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी ही घटना ग्रामस्थांना सांगितली असता याबाबत पोलिसांना कळविले.

घटनेची माहिती पो.हे.काँ. प्रभाकर शिरसाठ व त्यांचे सहकारी पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्याच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या खुणा किंवा जखमा नसल्याने पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यास कोणीही ओळखले नाही. या बाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. अधिक तपास पो.हे.काँ. प्रभाकर शिरसाठ हे करीत आहेत.

Web Title: Dead body of an unknown person was found in the pasture

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here