Home यवतमाळ विवाहितेचा लॉजमध्ये आढळला विचित्र अवस्थेत मृतदेह

विवाहितेचा लॉजमध्ये आढळला विचित्र अवस्थेत मृतदेह

Yavatmal News: लॉजमध्ये एका विवाहितेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Dead body of the married woman was found in a strange condition in the lodge

यवतमाळ : पुसद शहरातील सनी प्राईड लॉजमध्ये एका विवाहितेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  सपना संजय मोरे असे या मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान तिचा गळा आवळून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना उजेडात येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तपास केला असता काही तासातच मारेकर्‍याला अटक करण्यात आली आहे. हे कृत्य करण्यामागे मृत महिलेचा पती संजय मोरे असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

या प्रकरणातील मयत सपना मोर आणि संजय यांचा प्रेम विवाह झाला होता. मात्र, काही दिवसातच त्यांच्यात सतत वाद होत असल्याने हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन या संदर्भात पुसद न्यायालयात खटला सुरू होते. असे असताना संजय आणि सपना हे दोघेजण पुसदमध्ये सनी प्राइड लॉज मध्ये थांबले होते. त्यानंतर काही वेळाने संजय हा तेथून निघून गेला होता. तर दुसऱ्या दिवशी येथील रूमचे दार उघडत नसल्याने लॉज मालकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेउन दार उघडले असता, सपना यांचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केला असता तिचा गळा आवरून खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यावरून पोलिसांनी संशयाची सुई मारेकरी पती संजय मोरे याच्याकडे वळवत त्याला ताब्यात घेतले. या तपासात त्यानेच हे कृत्य केल्याचे कबूल केले असून पत्नीच्याच ओढणीने गळा आवळून ही हत्या केली असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पुसद शहर पोलीस करत आहेत.

Web Title: Dead body of the married woman was found in a strange condition in the lodge

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here