Home अहमदनगर गोदावरी नदीपात्रात आढळला तरुणाचा मृतदेह

गोदावरी नदीपात्रात आढळला तरुणाचा मृतदेह

Ahmednaagr, kopargaon:  ३० ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणाचा मृतदेह(Dead body) आढळला.

Dead Body of young man found in Godavari river bed

कोपरगाव: तालुक्यातील वारी हद्दीतील गोदावरी नदीपात्रात असलेल्या शिंगवे बंधाऱ्यालगत अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणाचा बुधवारी (दि. २) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला आहे. राजू नेपाळी (पूर्ण नाव माहीत नाही. रा. बिरोबा चौक, संवत्सर, ता. कोपरगाव) असे मृत तरुणाचे नाव असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.

मृत तरुणाची उंची पाच फूट असून, शरीराचा बांधा मजबूत आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राजेंद्र म्हस्के करीत आहेत. तसेच मृताच्या नातेवाइकांनी ओळख पटविण्यासाठी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याशी अथवा ०२४२३-२२२२३३ या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने केले आहे.

Web Title: Dead Body of young man found in Godavari river bed

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here