Home अहमदनगर अहमदनगर: गोदावरी नदीत आढळला युवकाचा मृतदेह

अहमदनगर: गोदावरी नदीत आढळला युवकाचा मृतदेह

Ahmednagar | Kopargaon News: गोदावरीत शुक्रवारी आढळली बॅग, रविवारी आढळला पाण्यात मृतदेह.

Dead Body of youth found in Godavari river

कोपरगाव: कोपरगांव तालुक्यातील धारणगाव येथील रहिवासी गणेश सूर्यभान वहाडणे (वय 24) रा.धारणगाव याचा मृतदेह गोदावरी नदीत तरंगताना आढळून आला असून सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीत गणेश कामाला होता. आप्पासाहेब कचरू वहाडणे यांच्या फिर्यादीवरून कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

गणेश वहाडणे हे सिन्नर तालुक्यातीलऔद्योगीक वसाहतीतील एका कंपनीत कामाला होते. शुक्रवारी रात्री त्यांची दुचाकी व बॅग धारणगाव-कुंभारी येथील गोदावरी नदीच्या पुलावर आढळून आली होती. शनिवारी सकाळी माजी नगरसेवक अनिल आव्हाड व त्यांच्या सहकार्‍यांनी बोटीतून नदीपात्रात शोध घेतला. मात्र गणेश आढळून आले नाही. यावेळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, इतर पोलिस कर्मचारी, नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे जवान व ग्रामस्थांनी शोध मोहिम राबविली होती.

रविवारी सकाळी गणेश वहाडणे यांचा मृतदेह गोदावरी नदीतील पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. घटनेबाबत आप्पासाहेब कचरू वहाडणे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास ए.एम. आंधळे करीत आहेत.

Web Title: Dead Body of youth found in Godavari river

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here