Home अहमदनगर संगमनेर: नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू

संगमनेर: नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू

Breaking News | Sangamner: प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

Death of a young man who went swimming in the river

संगमनेर: तालुक्यातील जोर्वे येथून वाहणाऱ्या प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. ५ मे रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. त्यातच प्रवरा नदीला आवर्तन सुटले आहे. दुपारच्यावेळी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जोर्वे गावातील चेतन सचिन लोणारी (वय १८) हा तरुण गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यास तत्काळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी दिगंबर नामदेव इंगळे यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. डमाळे करत आहेत.

Web Title: Death of a young man who went swimming in the river

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here