Home अहमदनगर नगरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात पेटवून घेणार्‍या युवकाचा मृत्यू

नगरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात पेटवून घेणार्‍या युवकाचा मृत्यू

Death of a youth who set fire to the court premises

अहमदनगर | Ahmednagar: विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल झाल्याने समाजात बदनामी झाल्याने मानसिक त्रासातून  राहुरी तालुक्यातील युवकाने नगरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वतःला पेटून (Fire) घेत आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न बुधवारी (दि.18) केला होता. ऋषिकेश विठ्ठल डव्हाण (वय 18 रा. बाभुळगाव ता. राहुरी) असे पेटून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी (दि.18) सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला.

पेटून घेतल्यामुळे ऋषिकेश सुमारे 75 टक्के भाजला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथील ससून रूग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार दरम्यान या युवकाचा मृत्यू झाला.

Web Title: Death of a youth who set fire to the court premises

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here