Home अकोले अकोले तालुक्यात बहिण भावाचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

अकोले तालुक्यात बहिण भावाचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

Akole News: बाभुळवंडी येथे बहिण भावाचा पाण्यात बुडुन (drowning) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना. असं दुःख कुणाच्या वाट्याला येऊ नये सुनिताताई अशोकराव भांगरे.

death of brother and sister due to drowning in Akole taluka

अकोले: रविवारी रंगपंचमीच्या दिवशी अकोले तालुक्यात बाभुळवंडी गावातील डोंगराच्या कुशीतील अडवळणावर असणाऱ्या बोरवाडी येथे दोन सक्ख्या बहिण भावांचा विहिरीतील पाण्यातबुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  करवंदे कुटुंबातील आठवीत शिकणारी कु.मनिषा गजानन करवंदे व सहावीत शिकणारा चि.श्रेयस गजानन करवंदे या बहिण भावाचा दुपारच्या सुमारास पाण्यात बुडुन अंत झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.  

आज अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनिताताई अशोकराव भांगरे यांनी करवंदे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. असं दुःख कुणाच्या ही वाट्याला येऊ नये.अतिशय हुशार व चाणाक्ष बहिण भावाचे जाणे हे आई वडिल,आजी आजोबा यांच्यासाठी खूप मोठी हानी आहे.

दोन्ही भावंडे गावाकडचं शाळेत होते तर आई वडील चाकण या ठिकाणी मोलमजुरी करुन काम करत आहेत. आपल्या चिल्यापिल्यांना दाणा पाणी गोळा करण्यासाठी आई वडील बाहेर गावी काम करत असताना अशी शोककळा पसरणे म्हणजे कुटुंबाचं संकटाचा महापुर येतो. करवंदे कुटुंबाच्या दुःखात भांगरे परिवार सदैव खंबीरपणे उभा राहिला. जसे करवंदे परिवाराचे लेकरं तसेच मलाही ते माझ्याच लेकरांसाखे असल्याची भावना या वेळी आदरणीय सुनिताताई अशोकराव भांगरे यांनी व्यक्त केली.

Web Title: death of brother and sister due to drowning in Akole taluka

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here